उड्डाण पुलावरील पथदिवे ताबडतोब चालू करा

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीची मागणी
 
 
कारंजा (घा.), 
street lights on the flyover कारंजा शहरातून जाणार्‍या महामार्गावर असलेल्या उड्डाणपूल व सव्हीस रोडच्या बाजूला असलेले पथदिवे आणि हायमास्ट १५ दिवसापासून बंद अवस्थेत आहेत. परिणामी परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पथदिवे चालू करावे या मागणीचे निवेदन कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने तहसीलदारांना दिले.
 
 
lights
 
treet lights on the flyover  उड्डाण पुलाच्या पलीकडे कारंजा शहरातील वार्ड १५, १६ व १७ ची वस्ती आहे. खैरी पुनर्वसनची वस्ती आहे, भालेवाडी दाभा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी काही वस्ती आहे. या सर्व वस्तीमधील लोकांचे आवागमन या पुलाखालून व पुलाच्या दोन्ही अंडरपास मधून होत असते. परंतु, पुलावरील पथदिवे आणि हायमास्ट पंधरा दिवसापासून बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागते. समस्येची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि पथदिवे चालू करावे, अशी मागणी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने तहसीलदार मार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.