उत्तर प्रदेशात दोन कोटी मतदार वगळले

अंतिम मतदार यादी जाहीर

    दिनांक :10-Apr-2026
Total Views |
लखनौ,
Uttar Pradesh voter उत्तर प्रदेशमध्ये 166 दिवसांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार राज्यात 13 कोटी 39 लाख 84 हजार 792 मतदार आहेत. राज्यातील एकूण मतदारांपैकी 54.54 टक्के पुरुष, तर 45.46 टक्के महिला आहेत. यापूर्वी, 27 ऑक्टोबर 2025 रोजी गोठवलेल्या मतदार यादीत राज्यात 15.44 कोटी मतदार होते. आता एसआयआरनंतर राज्यातील मतदारांची संख्या कमी होऊन 13 कोटी 39 लाख झाली आहे. एसआयआर प्रक्रियेमुळे राज्यातील मतदारांची संख्या 2.05 कोटींनी कमी झाली आहे.
 

Uttar Pradesh voter  
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत अंतिम मतदार यादी जाहीर केली. मुख्य निवडणूक अधिकाèयांच्या म्हणण्यानुसार, 6 जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीत एकूण 84,28,767 मतदारांची वाढ झाली आहे. ज्यांची नावे वगळण्यात आली होती ते मतदार फॉर्म 6 भरून यादीत सामील होऊ शकतात. अंतिम मतदार यादीनुसार, राज्यातील पुरुष मतदारांची संख्या 7,30,71,061, तर महिला मतदारांची संख्या 6,90,9525 आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या 4,206 आहे. राज्यातील 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 17,63,360 आहे.
पाच जिल्ह्यांमध्ये मतदारांमध्ये सर्वाधिक वाढ
अंंतिम मतदार यादीनुसार, प्रयागराजमध्ये मतदारांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली असून तेथे 3,29,421 मतदारांची वाढ नोंदवली गेली आहे. लखनौमध्ये 20,85,961, बरेलीमध्ये 2,57,920, गाझियाबादमध्ये 2,43,666 आणि जौनपूरमध्ये 2,37,590 मतदारांची वाढ झाली.
 
 
6 जानेवारी रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध
यापूर्वी, 6 जानेवारीला 12.55 कोटी मतदारांची मसुदा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या मसुदा मतदार यादीवर 6 मार्चपर्यंत जनतेकडून दावे आणि आक्षेप घेण्यात आले होते. मतदार यादीत आपली नावे समाविष्ट करण्यासाठी एकूण 86.69 लाख लोकांनी फॉर्म 6 भरला. आपली नावे वगळण्यासाठी 3.18 लाख लोकांनी फॉर्म 7 भरला. मतदार यादीतील 1.04 कोटी लोकांना त्यांच्या आई-वडिलांशी, आजी-आजोबांशी जुळत नसल्यामुळे नोटिसा बजावण्यात आल्या आणि 2.22 कोटी लोकांच्या नावांमध्ये तार्किक विसंगती आढळली.