यवतमाळ,
Vivek Gawande समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने ‘समता पर्व 2026’ अंतर्गत यंदाचा प्रतिष्ठेचा ‘मूकनायक पत्रकारिता पुरस्कार’ टीव्ही 9 मराठीचे यवतमाळ प्रतिनिधी, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे विवेक गावंडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
Vivek Gawande महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 7 ते 14 एप्रिल या कालावधीत ‘समता पर्व 2026’ विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरे केले जात आहे. गेल्या 22 वर्षांपासून समता पर्वात प्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकधारा, महानाट्य, यवतमाळ आयडॉल व अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या समता पर्वात यंदाचा ‘मूकनायक पत्रकारिता पुरस्कार’शनिवार, 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रदान करण्यात येणार आहे. विवेक गावंडे यांनी सामाजिक प्रश्नांंवर सातत्याने भक्कमपणे मांडणी करत पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. पुरस्काराबद्दल विवेक गावंडे यांचे सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.