“सोन्याची झळाळी आता अंघोळीतही!” २४ कॅरेट साबणाचा लक्झरी ट्रेंड

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
मुंबई
gold soap आजच्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेसाठी साबण हा अत्यावश्यक घटक मानला जातो. हात धुण्यापासून ते अंघोळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी साबणाचा वापर केला जातो. बाजारात काही रुपयांपासून ते काहीशे रुपयांपर्यंत विविध प्रकारचे साबण सहज उपलब्ध आहेत. मात्र, जगात असा एक साबणही आहे, ज्याची किंमत ऐकून सर्वसामान्य माणसाच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. हा साबण हजारो नव्हे, तर लाखो रुपयांच्या घरात विकला जातो.
 

24 karat gold soap, luxury gold soap price, 
हा विशेष साबण २४ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात येतो. त्याचा आकर्षक आणि राजेशाही लुक पाहूनच त्याची खासियत लक्षात येते. या साबणाच्या निर्मितीसाठी सोन्यासोबतच विविध दुर्मिळ नैसर्गिक घटक आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केला जातो. त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या या घटकांमुळे हा साबण त्वचा मऊ, कोमल आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतो, असा दावा करण्यात येतो.
या साबणाची निर्मिती gold soap  मध्यपूर्वेत केली जाते. विशेषतः लेबनानमधील त्रिपोली शहरात असलेल्या एका जुन्या आणि प्रतिष्ठित कंपनीत हा साबण तयार केला जातो. या कंपनीला सुगंधित आणि लक्झरी साबणांच्या निर्मितीत मोठा अनुभव आहे. सोन्याचा सूक्ष्म लेप आणि खास सुगंधित तेलांचा वापर केल्यामुळे या साबणाला वेगळाच दर्जा प्राप्त होतो.हा साबण सर्वसामान्य बाजारात सहज उपलब्ध नसून संयुक्त अरब अमिरातीतील निवडक लक्झरी स्टोअर्समध्येच विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळे हा साबण खरेदी करणे हे केवळ श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गासाठीच शक्य होते. अनेकदा हा साबण विशेष भेटवस्तू म्हणून वापरला जातो.
तज्ज्ञांच्या मते, या साबणामध्ये gold soap  वापरलेली सोन्याची पावडर त्वचेवर हलकी खडबडीत जाणवू शकते, मात्र ती त्वचेला कोणतीही हानी पोहोचवत नाही. उलट, त्वचेचा नैसर्गिक तेज वाढवण्यास मदत होते, असे सांगितले जाते.साधारण साबणाच्या तुलनेत अत्यंत महाग असलेला हा २४ कॅरेट सोन्याचा साबण केवळ स्वच्छतेसाठी नव्हे, तर लक्झरी आणि प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच हा साबण सामान्य लोकांसाठी केवळ कुतूहलाचा विषय ठरतो, तर श्रीमंतांसाठी एक विशेष अनुभव बनतो.