सेलू,
murder of young man मोबाईल हिसकावण्याच्या किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणाचा खून केल्याची धकादायक घटना आज शनिवार ११ रोजी सेलू येथे उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, बेलगाव येथील प्रवीण राऊत (२०) हा तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शुक्रवार १० रोजी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवले असता सूरज ढगे (२०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मोबाईल हिसकावण्याच्या वादातून प्रवीण राऊत याच्यावर दगडाने हल्ला करून त्याचा खून केल्याचे समोर आले. खून केल्यानंतर मृतदेह सेलू येथील विश्रामगृहाच्या मागील डोहात फेकून दिल्याची माहितीही त्याने दिली.
या गुन्ह्यात आणखी एक सहआरोपी असल्याची माहिती पुढे आली.murder of young man त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डीबी पथकातील अंमलदार अखिलेश गव्हाणे, मनोहर मुंडे, सचिन वाटखेडे, विनायक गोडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलिस अधिकारी प्रीतम निमगडे करत आहेत.