वणीत गोमांस तस्करीविरोधात दुहेरी कारवाई

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
1.50 क्विंटल मांस जप्त : तिघांवर गुन्हे

वणी, 
Beef smuggling शहरातील गोकुळनगर परिसरात शुक्रवार, 10 एप्रिल रोजी गोमांस तस्करी व विक्रीविरोधात पोलिसांनी सलग दोन धडक कारवाया करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. या कारवायांमध्ये तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण सुमारे 1.50 क्विंटल (150 किलो) प्रतिबंधित गोमांस जप्त करण्यात आले आहे. बजरंग दल, गौरक्षा समिती व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या मदतीने या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. जत्रा रोड परिसरातून गोमांसाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पहाटे 4 पासूनच सापळा रचून लक्ष ठेवले होते.
 
 
fir
 
पहिली कारवाई सकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी गोकुळनगर येथे छापा टाकून सलमान शकील शेख (25) व नावेद शेख रियाज (22, दोघेही रा. खडबडा मोहल्ला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 90 किलो 500 ग्रॅम गोमांस (अंदाजे किंमत 18,100) जप्त करण्यात आले. हे मांस अवैध विक्रीसाठी साठवून ठेवले असल्याचे विशाल पांडुरंग दुधबळे यांच्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम 5, 5 (सी), 9, 9(अ) तसेच बीएनएस कलम 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मारोती पाटील करीत आहेत.
 
 
 
Beef smuggling  त्यानंतर सकाळी 9 च्या सुमारास दुसरी कारवाई करण्यात आली. या कारवाईत अब्दुल माजिद अब्दुल सत्तार (35, मोमिनपुरा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 39 किलो गोमांस (7,800) तसेच एक ज्युपिटर स्कूटर (20,000) असा एकूण 27,800 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा मोपेडवरून गोमांस विक्रीसाठी नेत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस गजानन सावसाकडे करीत आहेत. पशुवैद्यकांच्या उपस्थितीत जप्त केलेल्या मांसाचा पंचनामा करून नमुने तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून उर्वरित मांस नष्ट करण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये विशाल दुधबळे यांच्या तक्रारीवरून गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.