प्रहार समाज जागृती संस्थेत रक्तदान शिबिर

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
नागपूर, 
Blood donation camp प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष कर्नल सुनील देशपांडे यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. आपल्या छोटेखानी भाषणात फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी नवीन पिढीला कर्नल देशपांडे यांची व त्यांच्या कार्याची ओळख व्हावी हा मुख्य उद्देश या उपक्रमांचा आहे असे सांगून त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला.
 
 
bloodd sdk
 
Blood donation camp  त्यांनी विशाखा मंगदे व राधा पिंपळापुरे लिखित ‘तेथे कर माझे जुळती’ पुस्तक लवकरच प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. रेखा पांडे, शुभम मोहगावकर, विशाखा मंगदे, दर्शना करजगावकर, प्राचार्या दीप्ती चौधरी व शीतल बागेश्वर व कर्नल सुनील देशपांडे यांचा सहवास लाभलेल्या विविध मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शमा देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.