नागपूर,
बँकर्स स्पोर्ट्स कौन्सिलने शरद भाके क्रिकेट अकादमी येथे Box Cricket Tournament बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले. पुरुष आणि महिला दोन्ही गटांतील संघांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला आणि खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकांचे केले. टीचर्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत भुयारकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी, बँकर्स स्पोर्ट्स कौन्सिलचे रमेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी संस्थेचे संघटन सचिव मंगेश पुराणिक, सहसचिव चंद्रकांत मानके, संयोजक परेश सुटेन आणि उपाध्यक्ष शरद पाध्ये प्रामुख्याने उपस्थित होते.
पुरुष गटात, बँक ऑफ (अ) ने स्टेट बँक ऑफ इंडिया (अ) चा २३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, बँक ऑफ इंडिया (अ) ने ६ षटकांत १३७ धावा केल्या, तर एसबीआय (अ) ला ६ षटकांत केवळ ११४ धावाच करता आल्या. दुसर्या एका सामन्यात, बँक ऑफ (ब) ने कॅनरा बँक (अ) चा ४ गडी पराभव केला. कॅनरा बँकेने ६ षटकांत ४८ धावा केल्या, परंतु बँक ऑफ इंडिया (ब) ने केवळ २ गडी गमावून ३ षटकांत ४९ धावा करत लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला. महिला गटात, युनियन बँक ऑफ इंडिया (अ) ने शिक्षक सहकारी बँकेचा ४७ धावांनी पराभव करून एकतर्फी विजय नोंदवला. युनियन बँक (अ) ६ षटकांत ५० धावा केल्या, तर टीचर्स को-ऑप. बँक संघाला २ षटकांत केवळ ४ धावांवर गुंडाळले.
Box Cricket Tournament दुसर्या सामन्यात, बँक ऑफ इंडिया (अ) ने युनियन बँक ऑफ इंडिया (ब) चा १६ धावांनी पराभव केला. बँक ऑफ इंडिया (अ) ने ६ गडी बाद ४१ धावा केल्या, तर युनियन बँकेचा संघ (ब) षटकांत २५ धावांवर सर्वबाद झाला. आणखी एका सामन्यात, युनियन बँक ऑफ इंडिया (ब) ने पंजाब नॅशनल बँकेचा ६ गडी राखून पराभव केला. पंजाब नॅशनल बँकेने ६ षटकांत २७ धावा केल्या, तर युनियन बँकेने (ब) केवळ २ षटकांत २८ धावा करून तेवढेच यश मिळवले. पुरुषांच्या गटात बँकेचे एकूण १७ संघ महिलांच्या गटात ६ संघ सहभागी होत आहेत.