दिग्रसच्या डॉ. गजानन निचत यांचा जन्मदिनी उपक्रम
दिग्रस,
Cold Water: Public Service Initiative भाजपा पुसद जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत यांनी शुक्रवार, 10 एप्रिल आपल्या जन्मदिनी जनसेवा उपक्रम राबवण्याचा संकल्प घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी महोत्सव व भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून उन्हाच्या काहिलीने त्रस्त वाटसरूंची तहान भागवण्यासाठी थंड माठांची पाणपोई उपलब्ध करून दिली.
पाणपोई ही एक धर्मार्थ व परोपकारी संकल्पना असून, पूर्वीपासून चालत आलेली भारतीय संस्कृतीतील ‘जलदान’ परंपरा आहे. ही केवळ पाण्याची सोय नसून, थकलेल्या वाटसरूंना दिलासा देणारी व माणुसकीचे दर्शन घडवणारी व्यवस्था आहे. याचा अभ्यास करून डॉ. गजानन निचत यांनी येथील अत्यंत वर्दळीच्या ठिकाण आर्णी बायपास पुलाजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ पाणपोई उपलब्ध करून दिल्याने नागरिक या उपक्रमाचे स्वागत करत आहेत. या पाणपोईचे लोकार्पण दिग्रस नगर परिषदेच्या अध्यक्ष पंचशीला इंगोले यांच्या अध्यक्षतेत, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या हस्ते, जिल्हा महामंत्री दत्ता रहाणे, नगरसेवक लक्ष्मी मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
Cold Water: Public Service Initiative प्रास्ताविक भाजपा शहर अध्यक्ष अभय इंगळे यांनी केले. या प्रसंगी महिला भाजपा शहर अध्यक्ष जागृती मेहता, रमेश करवा, सतीश मेहता, अरुण राठोड, मनोज राठोड, अनिल भरारे, हनुमान रामावत, वाजीद शेख, कल्पना पवार, प्रमोद बनगिनवार, सुभाष काटेकर, अॅड. विक्रम जाधव, संजय घरत, अमित चिद्दरवार, यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. गजानन निचत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेले हे सेवाभावी कार्य केवळ एक उपक्रम नसून समाजाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे आणि संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण ठरले. त्यांच्या या कार्याची उपस्थितांनी मनापासून दखल घेतली. यावेळी डॉ. निचत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा उपक्रम समाजात सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.