आज सहकारी पतसंस्थांची सहकार परिषद

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
वर्धा,
cooperative council कर्मचारी, नागरी, ग्रामीण पत संस्थेच्या सहकार परिषदेचे आयोजन पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू. इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात रविवार १२ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी हिंगणघाट कृउबाचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी राहतील. प्रमुख वते म्हणून सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक गौतम वालवे, नागरी ग्रामीण व पगारदार पतसंस्थांचा संघचे अध्यक्ष सुधाकर घवघवे व भाजपा वर्धा जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष सुधाकर साटोणे यांची उपस्थिती राहणार आहे.
 
 
 
आज सहकारी पतसंस्थांची सहकार परिषद
 
 
महाराष्ट्रातील अनेक सहकारी पतसंस्था या राज्यातील ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. सदस्यांना सवलतीच्या दरात कर्ज, बचत सुविधा, आर्थिक सुरक्षितता यासह इतर अनेक सोयीसुविधा पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य या पतसंस्था करीत असतात. तथापि, प्रचलीत कायद्या बाबत असलेली अनभिज्ञता तसेच कायद्यातील सुधारणामुळे होणार्‍या दुरगामी परिणामांबाबत असलेली अनास्था यामुळे अनेक संस्थांना भूर्दंड, न्यायालयीन प्रकरणे, सदस्यांच्या तक्रारींचा सामना करावा लागतो.cooperative council या अनुषंगाने, सदस्यत्व, कर्जवाटप, लेखापरिक्षण निवडणूका, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात होणारे फेरबदल सहकारी पत संस्थांसाठी सोईचे ठरावे याबाबत सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे यांचे मार्गदर्शन होईल. या परिषदेस सहकारी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वर्धा जिल्हा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संघाच्या वतीने ओंकार धावडे, प्रशांत भोयर, नितीन तराळे यांनी केले आहे.