दारव्हा आयटीआय महाराष्ट्रात अव्वल

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
दारव्हा, 
Darvha ITI tops येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेत 2022-2023 या वर्षात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणजेच 3 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
 
 
iti
 
Darvha ITI tops  या संस्थेला नावीन्यपूर्ण योजना राबवणे, प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा असणे, 100 टक्के प्रवेश करणे, गळतीचे प्रमाण शून्य ठेवणे, परीक्षेचा निकाल 100 टक्के राहणे, रोजगार व स्वयंरोजगार संधी 100 टक्के उपलब्ध करून देणे, विविध उपक्रम राबवणे, अद्ययावत कार्यशाळा, स्मार्ट क्लासरूम, सीसीटीव्हीची निगराणी, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टिम, खेळाचे मैदान, आऊटडोअर जिम्स आदींमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. शुक्रवार, 10 एप्रिल रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत मध्यवर्ती सभागृह एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे तत्कालीन प्राचार्य रमेश राठोड व सध्याचे प्राचार्य पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.