चनाखा परिसरातील घटना
राजुरा,
Death of leopard तालुक्यातील विहिरगाव नाका परिसरात रेल्वेच्या धडकेत एका दीड वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 11 एप्रिल रोजी सकाळी 8.40 वाजताच्या सुमारास दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गालगत उघडकीस आली. संबंधित परिसर हा राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपक्षेत्र व चनाखा नियतक्षेत्रात येतो. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. पी. तेलंगे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले असून, अहवाल प्रतीक्षेत आहे.
Death of leopard दरम्यान, या भागातून जाणारा रेल्वेमार्ग हा वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात येत असल्याने अशा घटना वारंवार घडत आहे. यापूर्वीही राजुरा परिसरात रेल्वेच्या धडकेत वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी , नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने वारंवार केली आहे. वनविभागाकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.