डिजिटल जनगणनेसाठी क्षेत्रिय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
Digital Census आगामी जनगणना २०२७ ही पूर्णपणे कागदविरहित व डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय तयारीने गती घेतली असून, जिल्हा स्तरावरील क्षेत्रिय प्रशिक्षकांचे (फिल्ड ट्रेनर) प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले.जिल्हा स्तरावर दि. ६ ते ११ एप्रिल रोजी या कालावधीत क्षेत्रिय प्रशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण तीन बॅचेसमध्ये घेण्यात आले. दि. १० एप्रिल रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिसर्‍या बॅचचे प्रशिक्षण पार पडले.
 
 
Digital Census
 
Digital Census  यामध्ये २१ क्षेत्रिय प्रशिक्षार्थींना डिजिटल जनगणनेचे तांत्रिक बारकावे, अ‍ॅपचा वापर आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मास्टर ट्रेनर संजय खडसे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा आणि डॉ. रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी, खामगाव यांनी प्रशिक्षार्थींना सखोल मार्गदर्शन केले.जनगणनेच्या कामात पारदर्शकता राहावी आणि उचचड पोर्टलवर काम करताना येणार्‍या तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या वतीने बुलढाणा जिल्हा समन्वयक म्हणून ऋषीकेश व-हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रशासकीय सज्जतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा समन्वयक ऋषीकेश व-हाडे आणि नायब तहसीलदार (सा.प्र.) प्रमोद करे यांनी जिल्ह्याचा व्यापक दौरा केला. यामध्ये दि. ८ एप्रिल रोजी मोताळा येथील ग्रामीण व शहरी भागात, दि. ९ एप्रिल रोजी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथे तर दि. १० एप्रिल रोजी मलकापूर, नांदुरा, खामगाव व शेगाव येथील ग्रामीण व शहरी भागांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या दौर्‍यादरम्यान ’चार्ज अधिकारी’ स्तरावर ग्रामीण व शहरी भागातील प्रत्यक्ष कामांची पाहणी करून क्षेत्रीय कर्मचार्‍यांना भेडसावणार्‍या तांत्रिक समस्यांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या. या डिजिटल उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.