-डॉ. सुधांशू त्रिवेदी यांचे प्रतिपादन
- ‘अॅक्सिस 2026’चे उत्साहात उद्घाटन
नागपूर,
भारताच्या पारंपरिक ज्ञानाचे जतन व पुनरुज्जीवन करण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन खा. Dr. Sudhanshu Trivedi डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी नागपुरात केले. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत आयोजित ‘अॅक्सिस 2026’ या तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. व्हीएनआयटीचे अध्यक्ष एम. मदन गोपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संचालक प्रा. प्रेमलाल पटेल व लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बालसुमण्यम प्रभाकरन उपस्थित होते.
Dr. Sudhanshu Trivedi प्रेरणादायी भाषणात डॉ. त्रिवेदी म्हणाले की, भारत सध्या विकासाच्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहे. डिजिटल व्यवहार, संरक्षण क्षमता व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील वेगवान प्रगतीमुळे भारताचे जागतिक स्थान अधिक मजबूत होत आहे. सेमीकंडक्टर, मोबाईल उत्पादन, संरक्षण व वाहन उद्योगांसारखे जागतिक क्षेत्र भारताकडे वळत असल्याने देशाची वाढती ताकद अधोरेखित होत आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा व आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जीनोम अभियांत्रिकी व थोरियम-आधारित अणुऊर्जा या क्षेत्रांत भारत भविष्यात जागतिक नेतृत्व करेल. पण, भारताच्या पारंपरिक ज्ञानाचे जतन व पुनरुज्जीवन करण्याची तेवढीच गरज आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविता उद््धृत करून त्यांनी भारतीय बौद्धिक वारशाचे महत्त्व पटवून दिले.