नागपूर,
Chitwanvis Center चिटनविस सेंटरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नियमित प्रवास मालिकेतील ‘ट्रॅव्हलर्स अड्डा’ या उपक्रमाची ६९ वी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात प्रवासप्रेमींना इजिप्तच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव आणि माहिती मिळणार आहे. या सत्रात उत्साही प्रवासी अंजली पाटील-गायकवाड या आपल्या इजिप्त दौऱ्याचे अनुभव, रंजक प्रवासकथा, उपयुक्त प्रवास टिप्स तसेच आकर्षक छायाचित्रे उपस्थितांसोबत शेअर करणार आहेत. त्यांच्या अनुभवकथनातून इजिप्तच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची सविस्तर ओळख करून दिली जाणार आहे.
हा कार्यक्रम रविवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वाजता चिटनविस सेंटर, सिव्हिल लाइन्स येथील लबर्नम सभागृहात होणार आहे. आयोजकांनी सर्व प्रवासप्रेमींना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. Chitwanvis Center इजिप्तच्या कालातीत संस्कृतीचा अभ्यास आणि प्रवास अनुभव जाणून घेण्याची ही संधी सर्वांसाठी विनामूल्य खुली ठेवण्यात आली आहे.
सौजन्य: योगिता चकोले, संपर्क मित्र