घाटंजीतील घटना : परिसरात हळहळ
घाटंजी,
Textile businessman: Suicide शहरातील नामांकित ‘रुक्मिणी साडी सेंटर’चे संचालक युवा कापड व्यवसायी उमेश गजानन गावंडे (वय 34, सुकळी, ता. जि. यवतमाळ, ह. मु. जगदंबानगरी, घाटंजी) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार, 11 एप्रिल रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
extile businessman: Suicide उमेश गावंडे शुक्रवार, 10 एप्रिल रोजी त्यांच्या मूळ गावी सुकळी येथे घरगुती भागवत सप्ताहासाठी गेले होते. शनिवारी ते नेहमीप्रमाणे घाटंजी येथे दुकान उघडण्यासाठी निघाले होते. काही वेळाने त्यांचा लहान भाऊही घाटंजीकडे आला. दुकान बंद असल्याने भावाने उमेशला कॉल करून बघितले असता कॉल रिसिव्ह होत नसल्याने त्याने जगदंबा नगरीतील उमेशच्या घरी जाऊन पाहणी केली असता, मधल्या खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत उमेश गावंडे आढळून आले. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेमुळे व्यापारी वर्तुळात शोककळा आहे.