मुंबई
Asha Bhosle प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सध्या त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Asha Bhosle चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाने जादू निर्माण करणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्याबाबत ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे,
Asha Bhosle कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या बातमीमुळे आशा भोसले यांच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. त्यांनी संगीत क्षेत्रात मोठे नाव कमावले असून त्यांच्या गाण्यांना लोकांकडून मोठी पसंती मिळते. त्या गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात सक्रिय आहेत.