Farmer livestock business पारवा परिसरातील शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी शेळी, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसायाकडे वळू लागला आहे. या व्यवसायामुळे स्थलांतर कमी होऊन येथील तरुणाईला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. मात्र पशुआहार महागल्याने शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे.
(संग्रहित छायाचित्र )
Farmer livestock business पशुखाद्याचे भाव झपाट्याने वाढले असूनही दुधाला मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे. येथील दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक व जोडव्यवसाय म्हणून केला जातो. या व्यवसायावर अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. तालुक्यात म्हैस व संकरित गायीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, दूध उत्पादक शेतकरी सध्या पशुखाद्याच्या वाढत्या किंमतीमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.
पशुखाद्याचा भाव
कडबा सिंगल 2 हजार 500 रुपये क्विंटल, मुरघास 8 हजार 500 ते 10 हजार रुपये टन, सरकी पेंड 1 हजार 800 ते 1 हजार 900 प्रती 48 किलो, शेंग पेंड 1 हजार 350 ते 1 हजार 700 प्रति 40 किलो, मका कुट्टी 1 हजार 150 प्रती 45 किलो.