वाळू च्या टिप्पर वर सात लाख 86 हजार रुपये दंड

मोटर वाहन निरीक्षक योगेश पाटील यांची कारवाई,

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
प्रतिनिधी भुमराळा
sand tipper सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत येणाऱ्या खापरखेडा लाड या वाळू घाटावर काही गावकऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक होत असल्याने दि. 8 एप्रिल 2026 रोजी वाळू वाहतूक अडवून पोलिस स्टेशन बिबी यांना माहिती दिली त्या प्रमाणे बिबी पोलिस स्टेशन चे कर्मचारी रात्री घटनास्थळी उशिरा दाखल झाले.दाखल होत काही टिप्पर ताब्यात घेतले व ठेकेदाराने विना रॉयल्टी टिप्पर घाटातच थांबुन ठेवले बिबी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टिप्पर ची माहिती लोणार तहसीलदार यांना देण्यात आली यावेळी काही टिप्पर धारकांजवळ रॉयल्टी आढळून आल्या मात्र ओव्हरलोड वाळू असल्याने तहसीलदार व बिबी पोलिस यांनी चेकिंग साठी बुलढाणा आरटीओ यांना कळवले. बुलढाणा आरटीओ यांनी सदर टिप्पर चे इलेक्ट्रॉनिक काट्यावर चढून मोजमाप केले असता अनेक गाड्यात क्षमतेपेक्षा जास्त वाळू आढळून आली. त्यामुळे या सर्व दहा टिप्पर.
 
 
 
sand tipper
 
 
MH28 BB 9922.
MH28 BX 6717.
MH28 BB 6040.
MH28 BB 9932.
MH28 BB 9931.
MH28 BB 4175.
MH28 CF 8743.
MH28 BB 9925.
MH28 BB 9242.
MH28 BB 7202.वर
5 लक्ष 86 हजार रुपये व इतर तीन वाहनाकडून मोटार वाहन कायद्यान्वये 2 लक्ष रुपये असे एकूण 7 लक्ष 86 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, दंडात्मक कारवाई करून सर्व टिप्पर सोडून देण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीरसिंग दिलावर यांच्या मार्गदर्शनात ,योगेश पाटील मोटर वाहन निरीक्षक,
निखिल ठाकूर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, राजेश ढाकणे. वामन अडसर. यांनी ही कारवाई केली.sand tipper अशाप्रकारे अवैद्य वाळू वाहतूक करून शासनाच्या लाखो ब्रास वाळूला चुना लावून शासनाचा महसूल बुडवत आहे. दररोज अशाप्रकारे शेकडो वाहने अतिरिक्तरेती वाहतूक करत असून याकडे, जिल्हाधिकारी, तहसीलदार, स्थानिक पोलीस, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी लक्ष द्यावे अन्यथा या सर्वांवर कारवाई करण्यासाठी महसूल मंत्री मुंबई यांना लेखी निवेदन देणार असल्याचे भाजपा जिल्हा अध्यक्ष सोशल मिडिया देवानंद सानप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले