बुलढाणा,
sharda jnanpith buldhana शारदा ज्ञानपीठ बुलढाणा येथे सन २०२६ चा सिनियर केजी विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आनंददायी वातावरणात पार पडला. या समारंभात लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. प्रमोद देशपांडे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना केजी टू पीजीया संकल्पनेवर सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
तसेच या समारंभासाठी शाळेचे उपाध्यक्ष अॅड. तुषार महाजन, सचिव अॅड. रामानंद कवीमंडन, व्यवस्थापक अॅड. आनंद चेकेटकर यांची उपस्थिती लाभली. तसेच शाळा प्रशासक जगताप, मुख्याध्यापिका अंतरकर, उपमुख्याध्यापक देशपांडे, बासिद सर, चौधरी सर, काळकर सर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी विद्यार्थ्यांना पदवीदान प्रमाणपत्र देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या समारंभा मध्ये सेल्फी पॉईट चा पालक व विदयार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला, व हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. प्रास्ताविक हे नेटके यांनी केले असुन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हे भावना जोशी यांनी केले.sharda jnanpith buldhana केजी विभागाच्या प्रभारी संगिता नेटके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व-प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी या समारंभासाठी अथक परिश्रम घेतले, त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.