१५ वर्षांवरील वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
प्रादेशिक परिवहन विभागाची तयारी पूर्ण
 
अमरावती, 
'Green tax' on vehicles राज्य शासनाने १५ वर्षे पूर्ण झालेल्या खाजगी वाहन संवर्गातील बीएस फोर वाहनांसाठी पर्यावरण कर दुप्पट करण्यात आला आहे. शासनाने वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ (पर्यावरण कर) आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आला असून पर्यावरण संरक्षण व वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात आली आहे.
 
 
Green tax
 
Green tax' on vehicles  अधिसूचनेनुसार, वाहनाच्या पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रत्येक ५ वर्षांसाठी ग्रीन टॅक्स आकारण्यात येणार आहे. वाहनाचा प्रकार आणि उत्सर्जन मानक लक्षात घेऊन कर निश्चित करण्यात येणार आहे. दुचाकी वाहनांमध्ये बीएस-६ व त्यावरील उत्सर्जन मानक यावर २ हजार रुपये, बीएस-४ व त्याखालील उत्सर्जन मानक यावर ४ हजार रुपये, दुचाकी वगळून पेट्रोलवर चालणारी इतर वाहने यामध्ये बीएस-६ व त्यावरील मानक ३ हजार रुपये, बीएस-४ व त्याखालील मानक ६ हजार रुपये, दुचाकी वगळून डिझेलवर चालणार्‍या वाहनांमध्ये बीएस-६ व त्यावरील ३,५०० रुपये, बीएस-४ व त्याखालील ७ हजार रुपये, तसेच क्रेनसाठी आकारण्यात येणारा कर कमाल ३० लाखांच्या मर्यादेत राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जुन्या वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.