हेलिकॉप्टर झाले भलत्या ठिकाणी लँड भुजबळ यांच्या सुरक्षेत मोठी चूक

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
पुणे
Chhagan Bhujbal पुण्यातील खानवडी परिसरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी संबंधित हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान मोठी दुर्घटना टळली. हेलिकॉप्टरने निर्धारित हेलिपॅडऐवजी थेट पार्किंग क्षेत्रात लँड केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 

Chhagan Bhujbal  
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी सुरक्षितपणे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडऐवजी पायलटकडून चूक होऊन हेलिकॉप्टर पार्किंगच्या दिशेने उतरवण्यात आले. लँडिंगदरम्यान झालेल्या या त्रुटीमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
घटनेनंतर स्थानिक प्रशासन Chhagan Bhujbal  आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. काही क्षणांसाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हेलिकॉप्टर सुरक्षितपणे स्थिर झाल्यानंतर पुढील अनर्थ टळला.दरम्यान, या प्रकाराबाबत अधिकृत कारणांचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. तांत्रिक बिघाड होता की मानवी चुकीमुळे ही घटना घडली, याचा सखोल तपास केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.या घटनेमुळे विमान व हेलिकॉप्टर सुरक्षिततेसंदर्भातील नियमांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.