कुरखेडा,
ghisulal kabra राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक परिवर्तनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कूटूंब प्रबोधन, स्व आधारित जिवन व नागरिकांचे कर्तव्यबोध या पंच परिवर्तणाकरीता जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेत सर्व हिंदू बांधवांनी जातीभेद विसरत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घिसूलाल काबरा यांनी केले.
हिंदू समाजाच्या जागृतीकरीता सनातन धर्म सनातन संस्कृती व सामाजिक एकतेच्या संकल्पाकरीता तालुक्यातील सोनसरी येथे सकल हिंदू समाज सोनसरी मंडल यांच्यावतीने हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर दत्तात्रय क्षीरसागर महाराज व बोधन मंगर महाराज उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी गावाच्या प्रवेशद्वारापासून दिंडी व भजनाच्या तालावर तसेच महिला व बालीकांच्या डोक्यावर कलश घेऊन कलश यात्रा कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आली. पुढे बोलताना घिसूलाल काबरा यांनी सांगितले की, सामाजिक समरसता अंतर्गत समाजातील भेदाभेद नष्ट करने,पर्यावरणाचा होणारा र्हास थांबवत पर्यावरण संरक्षण, जिवनाच्या धावपळीत कूटूंब व्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे कूटूंबाकडे सूद्धा लक्ष देत प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्राच्या प्रगतीकरीता स्वदेशीचा पूरस्कार करीत स्व आधारित जिवन जगणे ही काळाची गरज झाली आहे.ghisulal kabra तसेच संविधानाचे पालन करणारा जबाबदार नागरिक बनवणे या पंचपरिवर्तणाचा मोहीमेत हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन कूरखेडाचे माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे यांनी तर आभारप्रदर्शन नंदकिशोर दहिकर यांनी केले. यशस्वीतेकरीता सचिन दहिकर, वामन बोरकर, रामचंद्र राणे, योगानंद फरांडे, केशव शिवणकर, रमेश समर्थ, दामोधर अष्टेकर, गुणवंत धकाते, आनंदराव दहिकर, ज्ञानेश्वर मासरकर, सूभाष प्रधान आदींनी सहकार्य केले.