75 टक्के अनुदान मिळणार
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
यवतमाळ,
Horticulture Development Mission एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2026-27 अंतर्गत सामूहिक शेततळे ही योजना 75 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. पाण्याचे स्रोत निर्माण करून साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये, तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागांचे संरक्षण व्हावे, यासाठी शेततळ्यांना दर्जेदार प्लॅस्टिक फिल्मचे अस्तरीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. या योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी तीन मॉडेल्स निश्चित करण्यात आले आहेत. मॉडेल एक करिता 34 बाय 34 बाय 4.7 मीटरसाठी 5000 घनमीटर क्षमतेवर 4 लाख रुपये खर्चाचे मापदंड असून 3 लाख रुपये अनुदान देय आहे.
मॉडेल दोन करिता 30 बाय 30 बाय 4.4 मीटरसाठी 3500 घनमीटर क्षमतेवर 2.80 लाख रुपये खर्चाचे मापदंड असून 2.10 लाख रुपय अनुदान मिळणार आहे. मॉडेल तीन करीता 24 बाय 24 बाय 4.0 मीटरसाठी 2000 घनमीटर क्षमतेवर 1.60 लाख रुपये खर्चाचे मापदंड असून 1.20 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानाची रक्कम शेततळ्याची खोदाई, अस्तरीकरण व कुंपण आदी कामे पूर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात दिली जाणार आहे. इच्छुक शेतकèयांनी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्जासाठी शेतकरी नोंदणी क्रमांक, आधारकार्ड, सातबारा उतारा (फलोत्पादन नोंदीसह), 8अ, आधार संलग्न बँक खात्याचा तपशील, हमीपत्र तसेच वनपट्टाधारक असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकèयांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
Horticulture Development Mission ही योजना सामूहिक स्वरूपाची असून किमान दोन किंवा अधिक शेतकèयांनी एकत्र येऊन लाभ घ्यावा लागणार आहे. वनपट्टाधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाèयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.