नवी दिल्ली
ASSOCHAM भारतीय घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये ५०,००० टन सोने ठेवलेले आहे, ज्याची किंमत सुमारे १० ट्रिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ८३० लाख कोटी आहे. भारतीय व्यापाèयांच्या संघटना असोचॅम (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया) च्या अहवालानुसार, हे जगातील सर्वात मोठ्या १० सेंट्रल बँकांच्या एकूण साठ्यापेक्षाही जास्त आहे.
ASSOCHAM भारतीयांकडे इतके सोने आहे की अमेरिका आणि चीन वगळता जगातील जवळजवळ प्रत्येक देशाच्या वार्षिक जीडीपीपेक्षाही ते जास्त आहे. असोचॅमचे म्हणणे आहे की जर हे सोने देशाच्या बँकिंग प्रणालीत किंवा व्यवसायात गुंतवले गेले, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग अनेक पटींनी वाढू शकतो.
ASSOCHAM आरबीआयकडे ८८०.३ टन सोन्याचा साठा
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या आकडेवारीनुसार, भारताच्या अधिकृत सरकारी तिजोरीत 880.3 टन सोने आहे, जी जगात 8व्या क्रमांकावर आहे. हे अमेरिकेच्या ८,१३३ टन सोन्याच्या तुलनेत खूप कमी आहे, पण खाजगी साठ्यात भारत सर्वात पुढे आहे.
ASSOCHAM घरांमध्ये असलेले सोने भारताच्या जीडीपीच्या १२५ % पर्यंत
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अंदाजानुसार, २०२४ ते २०२६ दरम्यान सोन्याच्या किमतींमध्ये आलेल्या वाढीमुळे भारतीय घरांच्या संपत्तीला जबरदस्त चालना मिळाली आहे.
संपत्तीचे गणित: जानेवारी २०२६ पर्यंत भारतीय घरांमध्ये असलेल्या सोन्याचे मूल्य ५ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झाले आहे, जे भारताच्या एकूण जीडीपीच्या सुमारे १२५ टक्के आहे.
ASSOCHAM बँक ठेवींपेक्षा जास्त: कुटुंबांकडे असलेल्या बँक ठेवी आणि शेअर बाजारात गुंतवलेल्या एकूण पैशांच्या तुलनेत सोन्याचे मूल्य १७५ 5 टक्के अधिक आहे. म्हणजेच, भारतीयांचा आजही सोन्यावर सर्वाधिक विश्वास आहे.
संपत्तीचा भाग: भारतीयांच्या एकूण ‘गैर-मालमत्ता संपत्ती’मध्ये (जमीन-घर वगळून) सोन्याचा वाटा ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.