महिला व बालविकास विभागात ८,६६९ पदांची भरती

हजारो उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra government jobs राज्याच्या महिला व बालविकास विभागात ८,६६९ रिक्त पदांची मोठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्रीअदिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
 

Maharashtra government jobs  
या भरती प्रक्रियेमुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका तसेच विभागातील इतर महत्त्वाची पदे भरण्यात येणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या जागांमुळे महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत होता. त्यामुळे ही भरती तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिला आणि बालकांच्या पोषण, Maharashtra government jobs  आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळेच ही मोठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे.या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच जाहीर केली जाणार आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.या घोषणेमुळे राज्यभरात उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असून इच्छुकांनी त्याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.