नागपूर,
Mahila Kala Niketan महिला कला निकेतन द्वारा संचालित अंकुर प्री-स्कूलमध्ये नुकताच बाहुला-बाहुलीचा विवाह उत्साहात पार पडला. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात लहानपणी खेळली जाणारी भातुकली, लग्न अशा गोष्टी मागे पडत आहेत. त्याच गोष्टींना उजाळा त्याद्वारे आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न अंकुर प्री-स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षिका प्रशिक्षणाच्या विद्यार्थिनींनी केला.
Mahila Kala Niketan शाळेच्या परिसरातून बाहुला राघवची वाजत गाजत वरात निघाली, औक्षवण करून मंडपात आल्यावर, मंगलाष्टकांच्या गजरात, मुहूर्तावर बाहुली वैदेही आणि बाहुला राघवने एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. उपस्थित बाल गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून अभिनंदन केले. रुखवंत मांडण्यात होते. यावेळी फराळ आणि आईसक्रीमचा आस्वाद मुलांनी घेतला. विद्यार्थ्यांचे पालक देखील उत्साहात सहभागी झाले होते. मंडपातील सजावट तसेच इतर तयारी शिक्षिकांनी केली होती. संस्थेच्या पदाधिकारी आरती आठवले व किशोरी नगरनाईक या प्रसंगी उपस्थित होत्या. हा उपक्रम विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून परंपरेचे जतन करणारा आणि आनंददायी शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना ठरला.