मराठा साम्राज्याचा विस्तारदर्शविणारा नकाशा वगळला
एनसीईआरटीविरोधात असंतोष
कायदेशीर कारवाईचा इशारा
दिनांक :11-Apr-2026
Total Views |
सातारा
Maratha Empire Map राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा काढून टाकल्याने मराठीजनांकडून संताप व्यक्त होत आहे.
Maratha Empire Map यासंदर्भात वृषालीराजे भोसले म्हणाल्या की, एनसीईआरटीचा हा निर्णय अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या तेजस्वी परंपरेचा जिवंत वारसा आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Maratha Empire Map छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याने दिल्लीच्या राजकारणावर आपली पकड घट्ट केली होती. मराठ्यांचा पराक्रम केवळ सह्याद्रीपुरता मर्यादित न राहता थेट अटकेपार पोहोचला होता. राजस्थानातील रामपुरा मोहीम, बुंदीतील राजकीय हस्तक्षेप, कवकोरचे घनघोर युद्ध आणि पाटण तसेच मेर्टा येथील ऐतिहासिक विजय हे मराठ्यांच्या अजेय युद्धनीतीचे पुरावे आहेत. Maratha Empire Map अनेक राजपूत राज्यांनी त्यावेळी मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले होते. ही ऐतिहासिक वस्तुस्थिती असतानाही मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा अभ्यासक्रमातून हटवणे म्हणजे जाणीवपूर्वक इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे.