चंद्रपूर जिल्ह्यातही भूकंपाचा सौम्य धक्का

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर, 
Mild earthquake चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार, 11 एप्रिल रोजी दुपारी 4.22 वाजता 3.4 रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. सध्या या भुकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या भुकंपाचा केंद्रबिंदू राजुरा तालुक्यातील हरदोना येथे असून, त्याची तीव्रता 3.4 इतकी आहे. या भूकंपाचे निर्देशांक अक्षांश 19.742 उत्तर आणि रेखांश 79.240 पूर्व असून, त्याचा उगम जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खाली झाला.
 
 
mild Earthquake
 
Mild earthquake  तेलंगणातील करीमनगर हे भुकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे म्हटले जाते. अचानक झालेल्या भुकंपामुळे काही भागात नागरिकांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी, गोदावरी नदीचे पाणी जमिनीत शिरते. त्यामुळे भुगर्भीय हालचालींना गती मिळून अशा सूक्ष्म भूकंपाची शक्यता असते, असे सांगितले. निवासी जिल्हा दंडाधिकारी दगडू कुंभार यांनी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती दिली असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.