वाशीम जिल्ह्यातील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के

प्रशासनाकडून पुष्टी नाही

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
वाशीम,
mild Earthquake वाशीम जिल्ह्यातील रिसोड व वाशीम तालुक्यातील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची चर्चा असून, याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबात कुठेही भुकंपासारखी परिस्थिती नसल्याचे स्पष्ट केले.
 
 
mild Earthquake
 
याबाबत सविस्तर असे की, सकाळी ८.३० ते ९ वाजता दरम्यान वाशीम जिल्ह्यासह हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील काही भागात भुकंपाचे धक्के जाणवले. या भुकंपाची तीव्रता ४.७ इतकी नोंदविल्या गेली. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात रिठद भागात भुकंपाची सौम्य जाणीव झाली. वाशीम शहरातीलही काही भागात भुकंपांचे धक्के जाणवल्याने काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला असता वाशीम जिल्ह्यात कुठेही भुकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे स्पष्ट केले.mild Earthquake वाशीम जिल्ह्यालगत असलेले हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यात भुकंपाचे तीव्र धक्के बसल्याने जनतेत धावपळ दिसून आली . वाशीम जिल्ह्यातील काही भागातही भुकंपाचे धक्के जाणवल्याची चर्चा दिसून आली. परंतु, आपत्ती विभागाने याबाबत पुष्टी केली नाही.