भूकंपाचे सौम्य धक्के

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
पुसद येथेही भूकंपाचे सौम्य धक्के
पुसद, 
Mild earthquake tremors हिंगोली जिल्ह्यात शनिवार, 11 एप्रिल रोजी सकाळी रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. याचवेळी यवतमाळ पुसद, वसंतनगर तसेच आसपासच्या परिसरात या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
 
 
bhukamp
 
आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल प्रशासन व स्थानिक यंत्रणा सतर्क असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. भूकंपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जावे, इमारतीबाहेर मोकळ्या जागेत उभे राहावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी केले आहे.
शेंबाळपिंपरी, 
Mild earthquake tremors  येथून जवळच असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पांघरा (शिंदे) येथे शनिवार, 11 एप्रिल रोजी सकाळी 8.45 वाजता भूकंप झाला. केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किमी होता. रिश्टर स्केलवर त्याची 4.7 तीव्रता नोंदविण्यात आली. या भूकंपाचे सौम्य धक्के यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी व ईसापूर धरण तसेच आसपासच्या परिसरातही जाणवले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे यवतमाळ जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही. मात्र उशाशीच असलेल्या इसापूर धरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.