मोर्चापूर गावातील पांदण खडीकरण काम रखडले

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
दोन वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत
सेलू,
Morchapur: Pandan in village भूमिपूजन होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला असताना त्या पांदण रस्त्याचे काम होऊ नये ही शोकांतिका नाही तर आवेहलना नाही का असा संतापजनक सवाल शेतकरी करीत आहेत. सेलू तालुयातील सुकळी रोड ते रमणा रोड २ किमी तसेच शिलाबाई येळणे ते वाहितपूर रोड २ किमी या पांदण खडीकरणाच्या कामाला अद्यापही सुरुवात न झाल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या कामाचे भुमिपूजन सन २०२२ मध्ये पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी शेतकर्‍यांना लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवातच झाली नाही.

pandan
(संग्रहित छायाचित्र )
 
Morchapur: Pandan in village यानंतर पुन्हा २०२४ मध्ये पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाइन पद्धतीने या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तरीही परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. संबंधित ठिकाणच्या कामाचा वर्क ऑर्डर निघाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात २०२६ वर्ष उजाडूनही काम ठप्पच आहे. दरम्यान, तालुयातील इतर अनेक गावांमध्ये अशा प्रकारची कामे पूर्ण झालेली असताना, आपल्या गावातील काम मात्र रखडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित पांदण खडीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.