नागपूर,
Nagpur Garden Club RCNS तर्फे “बेसिक गार्डनिंग ट्रेनिंग”चे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण नागपूर गार्डन क्लबचे सचिव समित अदमाने यांनी हडस हायस्कूल येथील रोटरी हॉलमध्ये घेतले.प्रशिक्षणादरम्यान अदमाने यांनी विविध वनस्पतींसाठी लागणारी माती, पाणी देण्याच्या योग्य पद्धती, सूर्यप्रकाशाचे संतुलन तसेच खत व सूक्ष्म पोषक घटक यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी निलीमा बावणे यांच्यासह इतर सदस्यांनी गार्डनिंग संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे सत्र अधिक माहितीपूर्ण ठरले.
अध्यक्षांच्या अनुपस्थितीत आयपीपी प्रसन्ना यांनी अध्यक्षस्थान भूषवले. प्रमुख वक्ते समित अदमाने यांचा सत्कार पीपी डॉ. अशोक पाठक यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. Nagpur Garden Clubयावेळी डॉ. पाठक यांनी सदस्यांमध्ये गार्डनिंगची आवड वाढावी यासाठी इनडोअर प्लांट्सची रोपे भेट म्हणून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रमुख वक्त्यांचा परिचय तसेच आभार प्रदर्शन मानद सचिव प्रसेनजित राजुरकर यांनी केले.
सौजन्य: नितीन दाते,संपर्क मित्र