भीषण अपघात : ट्रक–पिकअप धडकेत चार ठार

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
नाशिक
Nashik accident नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे परिसरात आज झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला . ट्रक आणि पिकअप यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर पिकअप वाहनाला आग लागून ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे.
 

Nashik accident, Sinnar road accident, 
मिळालेल्या माहितीनुसार, पंचाळे–शहा रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक आणि पिकअपमध्ये समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर पिकअपने पेट घेतल्याने वाहनातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच Nashik accident  स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.या भीषण अपघातामुळे सिन्नर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.