नागपूर,
Niyog Therapist Vijay Gupte योग व नियोग थेरपीच्या माध्यमातून गेली चार दशके समाजसेवा करणारे ज्येष्ठ नियोग थेरेपिस्ट विजय गुप्ते यांचा ७५वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.गुप्ते यांनी औषधरहित नियोग थेरपीच्या माध्यमातून मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, टेनिस एल्बो, टाचदुखी तसेच स्नायू व नसांशी संबंधित विविध व्याधींवर प्रभावी उपचार करून अनेकांना दिलासा दिला आहे. त्यांच्या उपचारपद्धतीवर सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही विश्वास आहे.

त्यांच्या कार्याची विशेष दखल घेत त्यांना “जीरो माईल आरोग्य रत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी देखील त्यांच्या थेरपीची प्रशंसा केली असून, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी “हे माझे डॉक्टर आहेत,” असे गौरवोद्गार काढले आहेत. Niyog Therapist Vijay Gupte गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य घडले असून, त्यांनी योग व आरोग्य क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही ते निःस्वार्थपणे उपचार देतात.त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र