मुंबई
Nora Fatehi new song बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या ‘सरके चुनर तेरी’ या गाण्याभोवतीचा वाद अद्याप पूर्णपणे थांबलेला नसतानाच तिचे नवीन गाणे ‘बॅडी’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 7 एप्रिल रोजी नोरा फतेहीने हे गाणं इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरले आहे.
या गाण्याचे दमदार बीट्स आणि नोराचा ऊर्जावान डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. म्युझिक व्हिडिओमध्ये तिच्या आकर्षक नृत्यशैलीमुळे चाहत्यांनी पुन्हा एकदा तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक युजर्स ते ट्रेंडिंगमध्ये असल्याचे सांगत आहेत.
बॅडी या गाण्याचे Nora Fatehi new song चित्रीकरण मुंबईतील एका सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या ऑटो रिक्षांमध्ये कलाकारांचा डान्स आणि रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया हे या व्हिडिओचे आकर्षण ठरत आहे. काही जण आश्चर्याने पाहताना दिसतात, तर काहीजण उत्साहाने प्रतिक्रिया देताना दिसतात, ज्यामुळे व्हिडिओ अधिक नैसर्गिक आणि वास्तववादी भासतो.दरम्यान, नोरा फतेही ‘सरके चुनर तेरी’ या गाण्याशी संबंधित वादामुळे अद्याप पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. या प्रकरणाची सुनावणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली असून, 6 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीला ती अनुपस्थित राहिल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. तिला अंतिम संधी देत 27 एप्रिल रोजी सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सुनावणीत संबंधित पक्षांनी गाण्याच्या मजकुरावर आक्षेप घेत महिलांच्या सन्मानाशी संबंधित मुद्दे उपस्थित केले होते. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी क्रिएटिविटीच्या नावाखाली महिलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड होऊ नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी गाणे आक्षेपार्ह असल्याचे मान्य करत लेखी माफी मागितली असून, महिला सशक्तीकरणासाठी पुढील तीन महिन्यांत कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.