डॉ. पंजाबराव देशमुखांना ओबीसी महासंघाची श्रद्धांजली

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Dr. Punjabrao Deshmukh राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बहुजन समाजाचे मार्गदर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. आपल्या संघर्षमय जीवनात त्यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रात केलेले उल्लेखनीय योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. मात्र त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे योग्य आकलन आजच्या ओबीसी समाजात पुरेशा प्रमाणात होत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
 
Dr. Punjabrao Deshmukh
 
या कार्यक्रमाला शहराध्यक्ष परमेश्वर राऊत, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, विदर्भ कार्याध्यक्ष नगरसेवक शकील पटेल, राजकुमार गोसावी, अशोक काकडे, केशव शास्त्री, दौलत शास्त्री, किशोर जीचकार, सुरेश कोंगे, ज्ञानेश्वर ठाकरे, Dr. Punjabrao Deshmukh  हरि बनाईत, आशिष तायवाडे, मंगला राणे, माजी प्राचार्य बुटे, कोठे, दीपक कापसे, वाकडे पाटील, बोराडे, प्रणय पराते, हेमंत गावंडे तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: परमेश्वर राऊत, संपर्क मित्र