नागपूर,
tiger attacks in Devlapar १२ मार्चपासून सुरू असलेल्या देवलापार परिसरातील धरणे आंदोलनाला आज ३० दिवस पूर्ण झाले आहेत. देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू असून, वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे बळी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलावीत, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. tiger attacks in Devlapar या आंदोलनादरम्यान विविध मान्यवरांनी भेट देत स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रशासनापर्यंत त्या पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
सौजन्य: महादेव तायवाडे, संपर्क मित्र