राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोखो आंदोलकांवरआर्णी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
आर्णी, 
Protesters block road आर्णीतील नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोखो आंदोलन करणाèया आंदोलनकर्त्यावर शुक्रवार, 10 एप्रिलला आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी आर्णी तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन दुपारी साडेचार वाजता आर्णी यवतमाळ महामार्गावर दत्तरामपूर गावाजवळ राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्तीमोर्चा व इतर सहयोगी संघटनांनी या रस्त्यावर रस्ता रोखो आंदोलन केले होते.
 
 
fir
 
Protesters block road  निम्न पैनगंगा धरण प्रकल्प रद्द करा, एसआयए रिपोर्ट नाही, डीपीआर नाही, ग्रामसभांचे ठराव नाहीत, पुनर्वसन नाही, बेकायदेशीरपणे सुरू केलेले धरणाचे काम तत्काळ थांबवा, यांसह ‘गाव वाचवा, शेती वाचवा, भविष्य वाचवा, निम्न पैनगंगा धरण प्रकल्प रद्द करा’ या मागण्यांसाठी ‘रस्ता रोखोे’ आंदोलन करण्यात आलेे. आर्णी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्ग मोकळा केला. त्यांना आर्णी पोलिस ठाण्यात नेऊन गजानन निवृत्ती गोडवे, भुवन गौतम मुनेश्वर, बालाजी केशव कांबळे, प्रशांत विजय मुनेश्वर, देवराव शिवाजी पाईकराव, बिमोद विठ्ठल मुदाने, विक्रम गोविंद कांबळे, चक्रधर पांडुरंग देवसरकर, प्रमोद जाधव, विलास वसंत भोयर, सम्यक बुद्धशोक मुनेश्वर, शुभम तुकाराम खंदारे, सुनील दत्तराम गवई, दीपक राजाभाऊ इंगळे, दादाराव हिरामण भाजीखाये आणि इतर 10 ते 15 कार्यकर्ते यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.