पुलगाव नगराध्यक्षांची सभा नोंदवहीवर खोटी स्वाक्षरी

भाजपाचा पत्रकार परिषदेत आरोप

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
पुलगाव,
Pulgaon municipal council controversy, नगर पालिकेच्या वतीने आयोजित सभेला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित नव्हते. याचा व्हिडीओ विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने समाज माध्यमांवर टाकला. त्याहीनंतर नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांनी सभा बुकवर खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप भाजपाचे गटनेते प्रवीण पनिया यांनी पत्रकार परिषदेत केला.
 

Pulgaon municipal council controversy, 
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या अभय योजनेच्या मुदत वाढवण्यासाठी ६ एप्रिल रोजी पुलगाव नगरपालिकेतर्फे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, सभेच्या वेळी सभागृहात नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर, उपाध्यक्ष दीपक आहूजा यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक अनुपस्थित होते. तर भारतीय जनता पार्टीचे गटनेते प्रवीण पनिया, नगरसेवक दुर्गेश यादव यांनी सभागृहात त्यांच्या अनुपस्थितीचे व्हिडिओ जारी करून काँग्रेसला जनहिताशी कोणतीही गरज नाही, असा गंभीर आरोप लावला होता. या गंभीर मु्द्याला नवीन वळण आले जेव्हा भाजपाचे गटनेते प्रवीण पनिया यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवकांनी सभा मिनिट्स बुकवर हस्ताक्षर करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. या विषयावर भाजपाचे नगरसेवक आणि गटनेत्यांनी जिल्हाधिकार्‍यांना घटनाक्रमाची माहिती देत दोषी अधिकारी आणि हस्ताक्षर केलेल्यांवर कारवाईची मागणी केली माहिती विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रकार परिषदेत संदीप ठाकूर, नितीन बडगे, माधुरी इंगळे, शरद सावरकर, सुरेश सुखीजा, मनोज वालदे , सूरज गुप्ता आदी उपस्थित होते.
भाजपा नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल करू नये : नगराध्यक्ष
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नेहमीच खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशा भूल करतात. पुलगाव नगरपरिषदवर काँग्रेसची बहुमतात सत्ता आहे. तरीही आम्ही विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन काम करत आलो आहे. विविध विकास कामावर लक्ष केंद्रित करून कामे मार्गी लावत आहे. परंतु, भाजपाचे नगरसेवक खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांनी दिशाभूल थांबून विकास कामास हातभार लावावा, असे आवाहन नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर यांनी पत्रकार परिषदेत केले. ६ एप्रिल नोंदवहीवर सभा तहकूब करून १३ रोजी घेण्यात येणार असल्याचे नमुद केले असल्याची माहिती ब्राह्मणकर यांनी दिली.
उन्हाळ्यातील पाण्याच्या समस्येचे अवलोकन करण्यासाठी आम्ही सर्वजण सीता घाट वर्धा नदीवर गेलो. त्यामुळे थोडे उशिरा पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर सभेच्या नोंदवहीवर भाजपचे गट नेते आणि इतर ३ नगरसेवकांचे उपस्थितीचे हस्ताक्षर असल्याचे त्यांनी सांगितले.