संत ज्ञानेश्वर उद्यानातील वाॅकिंग ट्रॅक उंच व रुंद करा

- संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीची मागणी - अतिरिक्त आयुक्त बी वैष्णवी आणि महापाैरांना निवेदन सादर

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
sant dnyaneshwar park दत्तात्रय नगर येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नादुरुस्त वाॅकिंग ट्रॅक नव्याने 2 फूट उंच व अधिक रुंद करून बांधावा तसेच उद्यानात विविध आराेग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीच्या वतीने निवेदनातून महापाैर नीता ठाकरे आणि अतिरिक्त आयुक्त बी वैष्णवी यांना करण्यात आली.
 
 
sant dnyaneshwar park
 
 
निवेदनानुसार अतिरिक्त आयुक्तांनी उद्यानाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या हाेत्या. त्यानुसार लहान मुलांसाठी खेळणी, ग्रीन जिम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंचेस उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र सध्या ग्रीन जिम व खेळणी बसविण्याचे काम मंद गतीने सुरू असून ते तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
उद्यानातील माेकळ्या जागेत मातीचा भराव केल्यामुळे वाॅकिंग ट्रॅकची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी व माती ट्रॅकवर येऊन नागरिकांना चालणे कठीण हाेते. अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला घसरून पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सकाळ-सायंकाळ हजाराे नागरिक फिरायला येत असल्याने ट्रॅक अरुंद पडत असून ताे 2 फूट उंच व अधिक रुंद करून नव्याने बांधावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.sant dnyaneshwar park याशिवाय उद्यानातील माेकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याने सुरक्षा भिंत उंच करून नव्याने बांधावी, तात्पुरत्या स्वरूपात फेन्सिंग दुरुस्त करावी, अशी मागणीही करण्यात आली. डाॅ. बबन गांजरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे मार्गदर्शक पांडुरंग वाकळे पाटील, महादेव तोंडरे,दिनेश खूरसाडे मनोहरराव महाकाळकर, लक्ष्मण बालपांडे, महेंद्र शिरसागर, नागेश जैन, विनोद लुटे, निशिकांत मामीडवार, ऍड. कांबळे, देवाजी ठाकरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.