नागपूरात 'धुरंधरचा' सिक्रेट दौरा!

सरसंघचालकांची घेतली भेट

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Ranveer meets dr.mohanji bhagwat धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग शुक्रवारी अचानक नागपूरमध्ये दाखल झाला. त्याचा हा दौरा पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला होता. शहरात पोहोचताच त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत सरसंघचालक मोहनजी भागवताना यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली. माहितीनुसार, दुपारच्या सुमारास तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. त्याच्यासोबत काही सहकारीही होते. विमानतळावरून तो थेट महाल परिसरातील संघाच्या मुख्यालयात गेला. तेथे जवळपास दीड तास तो थांबून संघाची कार्यपद्धती, विविध उपक्रम आणि सेवाकार्यांबद्दल माहिती घेत राहिला. त्याचवेळी त्याने आपल्या चित्रपटासंबंधीही माहिती दिली असल्याचे समजते.
 
 
 
Ranveer meets dr.mohanji bhagwat
यानंतर रणवीर सिंग रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात गेला. तेथे त्याने आद्य सरसंघचालक डॉ. केशवराव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्याने संघाच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला आणि संघाशी संबंधित काही संस्थांबद्दल माहिती जाणून घेतली. संपूर्ण भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर तो पुन्हा नागपूर विमानतळावर परतला आणि रात्री मुंबईकडे रवाना झाला.