आयता ते खडका फाटा रस्त्याचे काम रखडले

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
आर्णी, 
Road work from Aita to Khadka Phata तालुक्यात येणाऱ्या सावळी सर्कलमधील आयता ते खडका या रस्त्याचे काम मागील काही महिन्यात झाले तेसुद्धा भ्रष्टाचारग्रस्त झाल्याने पूर्ण रस्ता उखडला आहे. अपूर्ण काम करून ठेकेदार पसार झाला असून आयता ग्रामपंचायतनेच या कामाबद्दल आक्षेप नोंदवला आहे. या रस्त्याच्या कामावर कुठेही गुणवत्तेनुसार काम न झाल्याने रस्त्याच्या कामाला सुरुवातीलाच घरघर लागली असून लवकरच या रस्त्याची वाट लागणार आहे. साईट भरणी सोडून देऊन साईटच्या रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी नाल्या व इतरही कामे सोडून कंत्राटदार पसार झाला.
 
 
kadaka
 
Road work from Aita to Khadka Phata  निकृष्ट कामामुळे या रस्त्याची काही दिवसांतच वाट लागणार आहे. अनेक रस्ते अपूर्ण आहे. साईट भरणी व एक कोट बाकीच आहे. अनेक वर्षे लोटूनसुद्धा साईट भरणीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. परिसरातील रस्त्याच्या कामाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असताना सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत असल्याचे दिसत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनसुद्धा रस्त्याची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. सार्वजनिक बांधकाम अभियंता व कत्राटदारांनी हा परिसर भ्रष्टाचाराने पोखरून टाकला आहे. या कामाची चौकशी करून रखडलेले काम त्वरित पूर्ण करा, अशी मागणी आर्णी साबां विभागाला निवेदनातून आयता ग्रामपंचायतने केली आहे.