नागपूर,
S. A. Deshpande passes away प्रसिद्ध वास्तुविशारद व शिक्षणतज्ज्ञ प्रा. शिरीष आत्माराम देशपांडे यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. प्रा. देशपांडे यांनी १९७०-८० च्या दशकात व्हीएनआयटीच्या वास्तुशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करताना वास्तुविशारद शिक्षणाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. एम. आर्च अभ्यासक्रम सुरू करण्यामागे त्यांची भूमिका होती.
S. A. Deshpande passes away प्रेरणादायी शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक पिढ्यांतील वास्तुविशारद घडवले. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘एस.ए. देशपांडे चषक’ प्रदान केला जातो. ११ एप्रिलरोजी दुपारी त्यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानापासून अन्त्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे आजीवन समर्पण आणि अमूल्य योगदानांचा गौरव म्हणून, मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संस्थेतर्फे एका माहितीपटाची निर्मिती करण्यात आहे. त्यांना ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.