रात्री मुक्काम
स्वयंसेवकांमध्ये उत्साह
पांढरकवडा,
तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील कंदकुर्ती येथे आयोजित कार्यक्रमासाठी नागपूरवरून राष्ट्रीय महामार्गाने जात जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे Sarsanghchalak Mohanji Bhagwat सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे शनिवार, 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पांढरकवड्यात आगमन झाले. संघाचे पदाधिकारी कुलदीप राशतवार यांच्या घरी भोजन करून दुपारी 1 वाजता ते नियोजित कार्यक्रमस्थळी रवाना झालेे.
Sarsanghchalak Mohanji Bhagwat शनिवारी रात्री उशिरा ते पांढरकवडा शहरातील ‘समर्पण’ या संघ कार्यालयात पोहचून मुक्कामी आहेत. रविवार, 12 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता निवडक संघ पदाधिकारी व स्वयंसेवकांची भेट घेऊन ते सकाळी 8 वाजता नागपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या दौèयात त्यांच्यासोबत संघाचे प्रांत प्रचारक गणेश शेटे होते. साधारण तीन वर्षांपूर्वी मोहनजी भागवत यांनी पांढरकवडा संघ कार्यालयाला भेट दिली होती. मात्र, संघाच्या शताब्दी वर्षात त्यांच्या मुक्कामामुळे स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी त्यांना असलेल्या विशेष सुरक्षा व्यवस्थेमुळे मागील 3 दिवसांपासून शहरात पोलिस, गुप्तचर विभागासह विविध पथके सक्रिय झाली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सर्व यंत्रणा सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी कार्यरत आहे.