मादी बछड्यांचा जन्म भ्रूण प्रत्यारोपणाने व्हावा

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
-केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री बघेल यांचे प्रतिपादन
-बैलांचे महत्त्व कमी होतेय

नागपूर, 
बैलांचे महत्त्व कमी होत असल्याने देशातील शंभर टक्के मादी बछड्यांचा जन्म लिंग वर्गीकृत वीर्याचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांनी आज नागपुरात केले. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अ‍ॅग्रिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकात्मिक एकल आरोग्य दृष्टिकोन: ग्रामीण सुदृढतेकरिता पशुवैद्यक, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रांचे बळकटीकरण’ विषयावर राष्ट्रीय पशुवैद्यक, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्याचे उद््घाटन बघेल यांच्या हस्ते झाले.
 
 
pashu dsl
 
माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अ. भा. विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त संघटन सचिव देवदत्त जोशी, भारतीय पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. उमेशचंद्र शर्मा, राष्ट्रीय मत्स्यविकास बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. के. बेहेरा, विद्यापीठाचे संचालक शिक्षण व अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, अ‍ॅग्रिव्हिजनचे राष्ट्रीय संयोजक मनीष फाटे व आयोजन संयोजक शिवम दुबे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
देशभरातील 23 राज्यांमधील 27 पशुसंवर्धन, दुग्ध तंत्रज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. राज्यमंत्री बघेल म्हणाले की, आधुनिकीकरणामुळे शेतीकार्यात बैलांचे महत्त्व कमी होत असल्याकारणाने लिंग वर्गीकृत वीर्याचा वापर वाढवून जास्तीत जास्त मादी बछड्यांना जन्माला घालण्याकरिता सरकार प्रयत्नशील आहे. याही पुढे जाऊन विकसित राष्ट्रांप्रमाणे देशातील शंभर टक्के मादी बछड्यांचा जन्म लिंग वर्गीकृत वीर्याचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे व्हावा.
राजस्थान पशुवैद्यक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुमंत व्यास, आसाम पशुवैद्यक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. निरंजन कलिता, राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बारबुद्धे, अधिष्ठाता जयपूर डॉ. डी. एस. मीना, भाकृअपचे फलोत्पादन सहाय्यक महासंचालक डॉ. सुधाकर पांडे, माफसुचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. संदीप इंगळे, डॉ. दीपक तिजारे, माफसुचे संचालक संशोधन डॉ. नितीन कुरकुरे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सचिन बोंडे, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत कोरडे हे सुद्धा उपस्थित आहेत.