आरमोरी,
ramdas masram नागरीकांचे प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू आहे. शेतकरी, शेतमजूर व नागरीकांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. या उद्देशाने महसूल विभाग हा विविध शासकीय विभागांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. नागरिकांना आवश्यक दाखले, जमिनीविषयी परवाने वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मारध्यमातून प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचविण्याचा प्रयत्न करुन नागरीकाचे प्रलंबित समस्याचे निराकरण हेच समाधान शिबिराचे उदेश असज्याचे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथे मंडळ अधिकारी कार्यालयात तहसिल कार्यालयाच्या वतीने आयोजित तिसरा टप्पा ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते शेतकर्यांना प्रलंबित असलेले फेरफार, नान क्रिमिनल प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य वाटप, रेशनकार्ड, जातीचे, उत्पन्नाचे व रहिवासी दाखले, जामिनीचे पट्टे वाटप करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन अर्ज स्वीकारण्यात आले. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी आमदार मसराम यांनी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षही उभारण्याचे आदेश दिले.
यावेळी आमदार रामदास मसराम वैरागड मडळ कार्यालयाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी आपल्याकडे आली आहे.ramdas masram त्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा केल्याने वैरागडला अपर तालुका घोषित करण्यात अला असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी तहसिलदार उषा चौधरी, नायब तहसिलदार हरीदास दोनाडकर, वाकुडकर, प्रशासक प्रदिप कुमरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम, प्रशासक मयुरी पेंदाम, वट्टी, पोलिस पाटील तुकाराम वैद्य, स्वप्निल ताडाम, कृषी विस्तार अधिकारी मोगरकर, कृषी मंडळ अधिकारी संदीप नाकाडे, मंडळ अधिकारी कुमरे, मंडल अधिकारी किरगे, शामराव अलाम यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.