तिकीटदरात १० टक्क्यांची तात्पुरती भाडेवाढ
सर्वसामान्य प्रवाशांना बसणार फटका
नागपूर,
ST Mahamandal महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाने उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम आणि लग्नसराईमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बससेवेच्या तिकीटदरात १० टक्क्यांची तात्पुरती भाडेवाढ केली आहे. ही दरवाढ बुधवार, १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून १५ जूनपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकार्यांनी दिली आहे.
निम-आराम (मिडी) बसेसला लागू
एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, भाडेवाढ केवळ साध्या, निम-आराम (मिडी) आणि रात्रसेवा बसेसनाच लागू आहे. शिवनेरी, शिवशाही, ई-बस (ई-शिवाई), निमआराम (एशियाड) आणि शयनयान (स्लीपर) बसच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
आलेली नाही. मासिक, आणि विद्यार्थी पासेससाठी ही भाडेवाढ लागू नसेल, त्यांचे दर पूर्वीप्रमाणेच राहतील. ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे, त्यांना प्रवासादरम्यान जुन्या आणि नवीन दरातील फरकाची रक्कम जमा करावी लागेल.
१६ जूनपासून पुन्हा मूळ दरपत्रकाप्रमाणे
ST Mahamandal सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात एसटी महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार आहे, त्याअंतर्गत ही १० टक्के वाढ करण्यात
आली असून १६ जूनपासून पुन्हा मूळ दरपत्रकाप्रमाणे (२५ जानेवारी २०२५चे दर) तिकीट आकारणी सुरू होईल. या भाडेवाढीमुळे गावी जाणार्या सामान्य प्रवाशांचा खिशा थोडा रिकामा होईल.
ई-बसेसच्या तिकीट दरात वाढ नाही
शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध, हिरकणी (निमआराम), विनावातानुकूलित शयनआसनी आणि अलीकडेच ताफ्यात दाखल झालेल्या ’शिवाई’ यांसारख्या वातानुकूलित ई-बसेसच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरामदायी प्रवास करणार्या प्रवाशांना हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. प्रवास नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी मासिक, त्रैमासिक पासेससाठी ही भाडेवाढ लागू नाही.