इतवारी रेल्वे स्टेशन ते मालदा टाऊन दरम्यान उन्हाळी गाडीचे नियोजन

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Summer Special Train दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाअंतर्गत येत असलेल्या इतवारीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन ते मालदा टाऊन - नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी दरम्यान उन्हाळी विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे गाडी क्रमांक नेताजी सुभाषचंद्र इतवारी - मालदा टाऊन - नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. ही विशेष गाडी नियोजित तारखांना प्रत्येकी तीन फेर्‍या धावणार आहे.
 
 
Special Train
 
Summer Special Train  ट्रेन क्रमांक ०८८७१ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी ते मालदा टाउन ही उन्हाळी विशेष गाडी नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकावरून १९ व तसेच २६ एप्रिल रोजी सकाळी ०.३० वाजता सुटेल आणि मालदा टाउनला ८ वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने, ट्रेन क्र. ०८८७२ (मालदा टाउन ते नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी ही उन्हाळी विशेष गाडी मालदा टाउन येथून १२:५५ वाजता सुटेल. २० व २१ एप्रिल आणि २७ एप्रिल, २७ जून रोजी परतीचे तिकीट काढता आहे. ही गाडी नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्टेशनवर १७ वाजता पोहोचेल.