शेतातील सागवानाला आग

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
सेलू,
teak plantation fire तालुयातील खडकी येथील शेतकरी मोहम्मद रियाज रशीद मुसानी यांच्या शेतात आग लागल्याने सागाची झाडं जळून खाक झाले. ही घटना आज शनिवार ११ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
 

teak plantation fire 
मिळालेल्या माहितीनुसार, खडकी येथील शेतकरी मोहम्मद रियाज रशीद मुसानी यांच्या शेतात सागाची झाडं आहेत. दुपारच्या सुमारास सागवनातून धूर निघाताना दिसले. आग लागल्याचे लक्षात येताच खडकी येथील समाजसेवक माणिक देडे आणि त्यांचे वडील खंडोजी यांनी शेताकडे धाव घेऊन पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग वाढत असल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी पाण्याचा मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. वृत्त लिहिस्तोवर आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.